चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड परिसरात मंगळवारी सकाळी ६० हून अधिक हातगाडी, खोकेरधारक व अतिक्रमणांवर चिपळूण न.प.ने हातोडा उगारला. तसेच काहींना एक दिवसाची मुदत देऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
येथील नगर परिषदेने दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठसह उपनगर भागात तसेच चिंचनाका ते पॉवर हाऊसदरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावताच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण झाले होते. रस्त्यालगत खोके उभारून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवल्याने पादचाऱ्यासह वाहतूकदारांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी गेल्या काही
दिवसांपासून ओरड सुरू होती. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटर बुजून होते. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.
पुन्हा गोवळकोट परिसरात ही कारवाई सुरु केली असून उपनगर परिसरात हा मोर्चा वळवला जाण्याची शक्यता आहे. अचानकपणे पुन्हा सुरु केलेल्या या कारवाईमुळे काही व्यावसायीकांची पळापळ सुरु झाली आहे. या कारवाईत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, बापू साडवीलकर, रोहित खाडे, संदेश टोपरे, बांधकाम अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, वलित वांगडे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 09/Apr/2025














