चिपळूण : गेले दोन दिवस बंद असलेला शहरातील गुहागर बायपास रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्यावर मोरी टाकण्याचे काम सुरू होते. सोमवारी रात्री उशिरा हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
शहरातील पॉवर हाऊस ते पागनाका दरम्यानच्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. गुहागर बायपास रोडया या ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यासाठी या रस्त्याला भेदून जाणारे गटार, त्यसाठी लागणारे पाईप टाकण्याचे काम दोन दिवस युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे शनिवार ते सोमवारपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला.
दरम्यानच्या काळात हा रस्ता खणून त्या ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत व सिमेंट, काँक्रीटदेखील करण्यात आले. सोमवारी या ठिकाणी काम करण्यात आले व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या ठिकाणी गुहागरकडे जाणारी वाहने ये-जा करीत असतात. आता रस्ता मोकळा झाल्याने वाहनांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 09/Apr/2025














