‘महावितरण’च्या लकी ड्रॉमध्ये ६५१ ग्राहकांना स्मार्ट फोन

रत्नागिरी : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लकी ड्रॉ सोमवारी (ता. ७) काढण्यात आला. प्रत्येक उपविभाग स्तरावर एक किंवा पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन दिला जाणार आहे तर प्रत्येक उपविभागात प्रत्येक क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन आणि प्रत्येक दोन क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच दिले जात आहे. महावितरणने वीजबिल भरणा ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी करण्याच्या उद्देशाने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली. या योजनेसाठी वीजबिल भरणारे सर्व लघुदाब वीजग्राहक पात्र ठरणार आहेत.

यापुढील लकी ड्रॉ मे व जून या महिन्यात काढण्यात येईल. ग्राहक रांगेत राहण्यापेक्षा ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीजबिलाचा भरणा करता यावा यासाठी संकेतस्थळ, महावितरण मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांना देय ग्राहकेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. जनता सध्या ७० टक्के अधिक वीज ग्राहक पद्धतीने वीजबिल भरत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी महावितरण योजना राबवत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 09/Apr/2025