मंडणगडचा ‘सोलर ऑपरेटर कल्टिवेटर’ राज्यात दुसरा

मंडणगड : इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स या पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरावरील तंत्रशोध स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगडने देदीप्यमान यश संपादित करत राज्यात दसरा क्रमांक मिळवला, या साधनाचे खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

३ ते ६ एप्रिल रोजी झालेल्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे ४५४ स्पर्धक (प्रोजेक्ट) यामध्ये सहभागी झाले होते. आयआयटी ते आयटीआय अशा वेगवेगळ्या शिक्षण स्तरातील इंजिनिअरिंग कॉलेजने यामध्ये सहभाग नोंदवला होता. रत्नागिरी जिल्हास्तरावर रैंकमध्ये असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड यांचा सोलर ऑपरेटर कल्टिवेटर हा प्रोजेक्ट या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सर्वोत्कृष्ट प्रेझेंटेशन व ग्रीन एनजों बेस प्रोजेक्ट हे या प्रोजेक्टचे आकर्षण ठरले. या प्रोजेक्टचे मार्गदर्शक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक अमित तांबे व प्राध्यापक सिद्धेश चव्हाण यांनी छोटा भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्याकरिता हे उपकरण कसे उपयुक्त आहे, याचे सादरीकरण या वेळी केले.

प्रोजेक्ट थिंक सोलर थिंक ग्रीन या बेसवर आहे. त्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडवाडमधील सहभागी विद्यार्थी सारीपुत्र पवार, विनय गणवे, समीर मेडेकर, रोहन गुजर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रोजेक्ट हा इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या दोन्ही विभागांच्या मेहनतीने तयार करण्यात आला. वेल्डर विभागाचे प्राध्यापक अशोक पवार, रिजा मुजावर पचिही यामध्ये योगदान लाभले.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करून आपण अक्षय ऊर्जेवर काम करत आहात की, जे पंतप्रधान मोदीजींचे स्वप्न आहे, असे सांगून फक्त प्रोजेक्टपुरता हा विषय मर्यादित न ठेवता स्टार्टअप सुरू कसा होईल, याबाबत प्रयत्न करा, असे म्हणत पुढील कामगिरीकरिता शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 09/Apr/2025