रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे चिपळूणमध्ये आशा सेविकांना मार्गदर्शन

रत्नागिरी : येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यात तीन ठिकाणी आशा सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.

वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. नीरजा यादव, डॉ. दीपाली पांडे, एलएचव्ही आय. डी. पड्यार, सीएचओ विद्या जाधव, गटप्रवर्तक पूजा सकपाळ उपस्थित होत्या. फुरूस आरोग्य केंद्रातील शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजल बेलवलकर, एलएचव्ही आकांक्षा कोळवणकर, गटप्रवर्तक संदीपा सावंत, तर चिपळूण पालिका केंद्रातील शिबिरामध्ये केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ स्वरूपा गरूड, गट प्रवर्तक सुनीला जाबरे उपस्थित होते.

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून श्वेता कदम, सायली चव्हाण आणि अनुष्का होरंबे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरांमध्ये आशा सेविकांना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत, आधुनिक उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा उपयोग झाल्याचे आशा सेविकांकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 09-04-2025