मिऱ्या बंधाऱ्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मिऱ्या धूप प्रतिबंधारक बंधाऱ्याची पाहणी केली आणि पत्तन अधिकारी व ठेकेदाराला सूचना केल्या. मिऱ्या बंधाऱ्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून, काही मीटरचे काम रखडले आहे.

हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी आणि तेथील प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मिऱ्या बंधाऱ्याची पाहणी केली आणि अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यास सांगून ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक बाबा नागवेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 10/Apr/2025

Shanti real estate 1