विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील रहावे : डॉ. दत्तात्रय सोपनूर

पाली : निपुण महाराष्ट्र कृती आराखड्यात दिल्याप्रमाणे विद्यार्थी प्रगती अध्ययन स्तरानुसार होईल यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा, असे प्रतिपादन शिक्षणविस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर यांनी सांगितले.

साठरे येथे आयोजित पाली केंद्राच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख विष्णू पवार उपस्थित होते. या प्रसंगी निपुण महाराष्ट्र कृती आराखडा, चावडी वाचन, मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पाली केंद्रातील नवोदय परीक्षेतील यशाबद्दल पाली नं. १ शाळेचे शिक्षक मारुती घोरपडे, साठरे नं. २ शाळेची विद्यार्थिनी आकांक्षा यादव हिने रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा व मार्गदर्शक शिक्षिका स्मिता परुळेकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच साठरे नं. २ शाळेतील कार्तिकी सागवेकर व शिक्षक दिगंबर तेंडुलकर यांची नासा संस्था (अमेरिका) भेटीसाठी निवड झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पाली केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील गुणवत्ता विकासातील मार्गदर्शक डॉ. सोपनूर व केंद्रप्रमुख विष्णू पवार यांना गौरविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मी शिंदे, राहुल मिसाळ व पाली केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 10/Apr/2025