रत्नागिरी : मांडवी किनारी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’ युनिटचे उद्घाटन

रत्नागिरी : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुविधेसाठी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’च्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, शहरातील मांडवी किनाऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिट बांधण्यात आले आहे. या युनिटचे उद्घाटन आमदार चव्हाण यांनी बुधवारी (९ एप्रिल) रोजी सायंकाळी केले.

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’ विथ ‘बायो डायजेस्टर’चे ९ युनिट आणि चेजिंग रूमच्या एकूण ९ युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून ही सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटी सुविधा उपलब्ध झाली आहे. येथे पाच रुपयांत ही सुविधा पर्यटकांना घेता येणार आहे.

मांडवी येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटा शुभारंभ भाजपा कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपाच्या महिला मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, सौ. पल्लवी पाटील, सौ. सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये ही अत्याधुनिक टॉयलेट उपलब्ध करणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर होईल व पर्यटकांना चांगली सुविधा मिळेल, असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

Kohinoor furni.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 11-04-2025