रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे स्टॉप आणि सुर्वेवाडी येथे घराच्या बाजूला गावठी हातभट्टीची व विदेशी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या दोघांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१० ते ८ वाजण्याच्या कालावधीत करण्यात आली.
विजय वसंतराव सुर्वे (५२, रा. कुचांबे मराठवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) आणि मनोज ऊर्फ नाना पांडुरंग जागुष्टे (रा. कुचांचे सुर्वेवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
यातील विजय सुर्वे हा आपल्या ताब्यात ९०० रुपयांचा तर मनोज उर्फ नाना जागुष्टे हा आपल्या ताब्यात १ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाई सत्रामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 11/Apr/2025














