चिपळूण : चिपळूण येथे मायक्रो फायनान्स विरोधात ११ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सकाळी ११ वा. हा मेळावा होईल. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई उपस्थित राहणार आहेत.
कोकणात मोठ्या प्रमाणात मायक्रो फायनान्सचे जाळे पसरले आहे. कोकणी लोकांनी हे कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडून ४५ टक्के व्याजदराने वसुली केली जात आहे. त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे. दमबाजी करणे, मारहाण करणे, मानसिक त्रास देणे या गोष्टी सुरू आहेत. याला कंटाळून काहींनी आत्महत्या देखील केली आहे.
या विरोधात कोकण जनविकास समिती सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार ११ रोजी चिपळुणात मेळावा होत आहे. सर्व संघटनांनी यावेळी उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी जनता दलाचे प्रभाकर नारकर, संजय परब, जगदीश नलावडे, अॅड. प्रशांत गायकवाड, सुरेश रासम, नम्रता पाटकर, संग्राम पेटकर, दिनेश राणे आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 11/Apr/2025














