रत्नागिरी : कोकणातील क्रिकेटला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये दोनवेळा विजेता ठरलेल्या जेटसिंथेसिसचे रत्नागिरी जेट्स यांनी भारतातील आघाडीचे सीफूड निर्यातदार गद्रे मरिन एक्स्पोर्टसोबत भागीदारी केली आहे.
ते २१ एप्रिल ते २१ मे या कालावधीत रत्नागिरीत उन्हाळी शिबिर घेणार आहेत. रत्नागिरीत होणाऱ्या उन्हाळी क्रिकेट शिबिरात रत्नागिरीमधील सर्व शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
या भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटू ओळखून त्यांचे कौशल्य विकसित करणे हाच यामागचा उद्देश आहे. हे शिबिर लेव्हल २ चे प्रशिक्षक लक्ष्मण पांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि रत्नागिरी जेट्सचे मुख्य प्रशिक्षक रणजित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 11/Apr/2025














