कंझ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

रत्नागिरी : विविध गृहोपयोगी वस्तू व नावीन्यपूर्ण वस्तूंच्या कंझ्युमर्स शॉपी प्रदर्शनाचा सोमवारी (ता. १४) शेवटचा दिवस आहे. रविवारी दिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी रत्नागिरीकर ग्राहकांची गर्दी झाली होती.

गेल्या ३२ वर्षांपासून हे प्रदर्शन संयोजिका मीनल मोहाडीकर रत्नागिरीत आयोजित करत आहेत. ग्राहकाला एकाच ठिकाणी, अनेक वस्तू, योग्य दरात मिळण्यासाठी कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी व गृहसजावटींच्या स्वस्तूंचे प्रदर्शन तीन दिवसांपासून सुरू झाले. या प्रदर्शनात भारतातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या मोठ्या कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

प्रदर्शन सोमवारी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. शेवटचा दिवस असल्याने येथे अनेक योजनांचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे. अनेक कंपन्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला असल्याचे या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 14-04-2025