खेड : बोरज गावातील ब्रिटिशकालीन धरण परिसरात सध्या गंभीर प्रदूषणाचा प्रश्न उभा राहिला असून, स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून दबाव तंत्र वापरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रदूषण करणाऱ्या उद्योगाच्या मागे स्थानिक राजकीय म्होरक्याचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे. राजकीय आश्रयामुळेच संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी हा प्रकार उघड झाला बोरज धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूस एका खाजगी जागेमध्ये केमिकलचा रासायनिक घनकचरा आणि राख मोठ्या प्रमाणावर ती टाकल्याचे उघड झाले यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ परिषदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली मात्र अजूनही कारवाई न झाल्यामुळे कारवाईचे घोडे नेमके आडले कुठे असा प्रश्न पडला आहे.
धरण परिसरातील पाणी, माती आणि हवेत विषारी घटकांचे प्रमाण वाढत असून, पशुधन व शेतीवर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. नागरिकांनी वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. प्रदूषण नियंत्रण महामंडळ फक्त आश्वासनांची भाषा बोलत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा खुलासा मागवण्यात आला होता. दरम्यान, आता या घटनेला पंधरा दिवस उलटूनही कोणताही खुलासा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. यावरून जिल्हा प्रशासन देखील कोणाच्या दबावाखाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. या सर्व प्रकाराविरोधात बोरज येथील तक्रारदार परेश शिदे आणि ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे.
प्रदूषण नियंत्रण दबावाला
नुकतेच जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग हे शंभर दिवसाच्या शासनाच्या उपक्रमा संदर्भात खेडमध्ये आले असताना परेश शिंदे यांनी त्यांच्याशी सर्व पुराव्यासह चर्चा केली या संदर्भात तात्काळ कारवाईच्या आश्वासन देखील त्यांनी दिले मात्र अद्यापही प्रशासकीय सूत्र हालत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं कोणाच्या दबावाखाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 14/Apr/2025














