रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षकपदी शशांक बावचकर

इचलकरंजी : प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षकपदी आली आहे. नियुक्तीचे पत्र उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी बावचकर यांना पाठीवले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर जिल्हानिहाय पक्ष कार्याचा आढावा घेत आहेत.

त्यांच्या सूचनेनुसार बावचकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावचकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचीही जबाबदारी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 14/Apr/2025