दापोली : आंजर्ले समुद्रात सोडली पाच ऑलिव्ह रिडले कासवांची पिले

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा महोत्सव सुरू झाला आहे. हा महोत्सव १० मे पर्यंत सुरू राहणार आहे. आंजर्ले किनारी भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना हा महोत्सव पर्वणी ठरत असून, पहिल्यादिवशी पाच ऑलिव्ह रिडले कासवाची पिले समुद्रात सोडण्यात आली.

एप्रिल, मेमध्ये पर्यटकांची गर्दी असते. अशावेळी त्यांनादेखील पिलांच्या जन्माचा आनंद घेता येऊ लागला आहे. आंजर्लेकिनारी कासव बचाव मोहिमेअंतर्गत संवर्धन करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिले बाहेर येण्यास प्रारंभ झाला आहे. या हंगामात या किनाऱ्यावर ४३ कासवांची घरटी आढळून आली असून, त्यातील ६,४९० अंडी संरक्षित केली आहेत. सरपंच मेघना पवार, प्रथमेश केळसकर, संदेश देवकर, शुभांगी गुरव, अभिनय केळसकर, क्रांती मिंडे, अजिंक्य केळसकर, सूजन खेडेकर, सुयोग मयेकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 14/Apr/2025