रत्नागिरीत ४ मे रोजी किडस् सायक्लोथॉनचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे दि. ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किडस् सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, मुलांनी मोबाइलवर गेम खेळण्याऐवजी सुटीचा आनंद लुटावा याकरिता सायकल चालवावी, तंदुरुस्त रहावे, या उद्देशाने सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

सुवर्णसूर्य फाउंडेशनने या स्पर्धेसाठी छोटे अंतराळवीर चालवणार सायकल अशी संकल्पना मांडली आहे. या उपक्रमातून खगोल विज्ञानविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. या सायक्लोथॉनमध्ये ६ ते १० वयोगटांसाठी पाच किलोमीटर, तर ११ ते १५ वयोगटांसाठी १० किलोमीटर अंतर निश्चित केले आहे. यामध्ये जास्तीत जास्त बालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 14/Apr/2025