रत्नागिरी : तालुक्यातील गोळप-धोपटवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी रात्री ८.१५ वा. सुमारास करण्यात आली. सुरेश कृष्णा राज्ये (वय ५२, रा. राज्येवाडी घाणेकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार निखिल साळवी यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयित हा रविवारी रात्री गोळप-धोपटवाडी येथील एसटी बस स्टॉप पिकअप शेडच्या मागील बाजूस कातळावर सार्वजनिक ठिकाणी त्याच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना मद्यपान करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 15/Apr/2025













