लांजा : भांबेड बाजारपेठ येथे वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी टेम्पो चालकांवर गुन्हा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठ येथे दाभोळे ते वाटूळ जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना व नागरिकांना धोका होईल अशा स्थितीत टेम्पो पार्क केल्याप्रकरणी चालकाविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी सकाळी ११.५० वा. सुमारास करण्यात आली.

संजय पुंडलिक सुर्वे (५२, रा. शिपोशी कुरुपवाडी, लांजा) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार दिनेश आखाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी संशयित चालकाने आपल्या ताब्यातील अॅप्पे टेम्पो (एमएच-०८-एक्यू-८७३७) हा भांबेड बाजारपेठे येथे दाभोळे ते वाटून जाणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व वाहनांना धोका होईल तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत पार्क केला होता. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 15/Apr/2025