लांजा : लांजा शहरात अनेक दिवसांपासून बेवारसपणे फिरणारा एक तरुण नजरेस पडत होता. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची माहिती घेत केरळ येथील या व्यक्तीची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घडून आणण्यात लांजा पोलिसांना यश आले. एकमेकांपासून दुरावलेल्या माय लेकराची भेट घडवून देणाऱ्या लांजा पोलिसांच्या कामगिरीचे जनतेतून कौतुक केले जाते आहे.
लांजा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात एक अनोळखी व्यक्ती गेली तीन ते चार दिवसापासून वैफलावस्थेत फिरताना दिसून येत होता. लांजा पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला आपल्या ताब्यात घेतले. तो स्वतःची कोणतीही माहिती देत नव्हता त्यामुळे अधिक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने लांजा येथील बेकरी व्यवसायिकांची मदत घेऊन या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव निधिरज के टी राहणार कोट्टीएन राज्य केरला असे असल्याचे निदर्शनास आले. माहितीच्या आधारे लांजा पोलीसांकडून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता ही व्यक्ती बरेच दिवसापासून बेपत्ता असल्याबाबत त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्या तरुणाचे नातेवाईक आई, वडील लांजा पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. त्या व्यक्तीला त्याचे आई, वडीलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. बरेच दिवस बेपत्ता असलेल्या आपल्या मुलाची भेट लांजा पोलीसांनी घडवून आणल्याबद्दल आई वडीलांनी लांजा पोलिसांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 15/Apr/2025














