मंडणगड : तालुक्यातील माहू गावठाणवाडी येथे एका ८० वर्षीय मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनीषा चाँडु बैंकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजण्यापूर्वी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०९.४९ वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनीषा बैंकर या मनोरुग्ण होत्या. त्या ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. 14 रोजी, गावठाणवाडी येथील घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी सीआरपीसी १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:45 PM 15/Apr/2025














