दहावी बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांच्या प्रस्तावासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यातील दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणान्या ग्रेस गुणांच्या प्रस्तावासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. शिक्षण मंडळाने दि. २१ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ दिली आहे, तर क्रीडा विभागाने ही मुदत दि. १७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अधिक संधी मिळणार आहे.

क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाच्या खेळाडूंना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ग्रेस गुण देण्यात येतात. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार ग्रेस गुण दिले जातात. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणाऱ्या एकूण गुणांमध्ये ग्रेस गुण समाविष्ट करून दिले जातात. २०२३- २४ पर्यंत याअंतर्गत ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत होते. परंतु त्रुटी राहत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना गुण न मिळाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली.

ग्रेस गुणांसाठी आपले सरकार या संकेतस्थळाद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाने सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आपले सरकार संकेतस्थळ देखभालीच्या कामासाठी १० ते १४ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 18/Apr/2025

Mobile hub