रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे आणि शहरानजीकच्या चंपक मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६.३० वा. कालावधीत करण्यात आली. चंद्रकांत शंकर पिलणकर (वय ५४, रा. सनगरेवाडी, रत्नागिरी) आणि राहुल गुलाब तिवारी (३३, रा. मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील चंद्रकांत पिलणकर हा कोतवडे-सनगरेवाडी येथे तर राहुल तिवारी हा चंपक मैदानात या सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 19/Apr/2025
