गुहागर आरोग्य विभागातर्फे सीपीआर अभियान संपन्न

गुहागर : तालुका आरोग्य विभागाच्यावतीने हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (सीपीआर) या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांना ८ एप्रिल रोजी तालुका आरोग्य कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले असून हे अभियान टप्प्या टप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनःश्याम जांगीड यांनी दिली.

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (सीपीआर) एक। अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य असून सामान्य नागरिकांनी याचे। प्रशिक्षण घ्यावे जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. जे अचानक हृदय बंद पडल्यास किंवा श्वासोच्छवास थांबल्यास एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. अचानक हृदयविकारामुळे होणारे मृत्यू अजूनही चिंतेचा विषय आहे. आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा होत असली, तरी आपत्कालीन परिस्थितीततात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो अशा परिस्थितीत सीपीआरचे ज्ञान आणि कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने याचे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे डॉ. जांगीड सांगितले. यांनी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर ग्राम स्तरावर सामान्य नागरिकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे डॉ. जांगीड यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 19-04-2025