खेड : तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अमलदार कोमल रघुनाथ यांच्या तक्रारीवरून प्रकाश गोपाळ जाबरे (वय ५८, रा. सुसेरी नं. ०२, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रकाश जाबरे हा सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळविताना आढळून आला. त्याच्याकडून रोख रक्कम ९४० रुपये तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात चांगलाच खळबळ उडाली असून, जुगारांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 23/Apr/2025














