संगमेश्वर : कोंडअसुर्डे, काटवलीसह पाटगावमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंच आरक्षण

देवरुख : जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून सरपंच पदाच्या आरक्षणासाठी संगमेश्वर तालुक्यात पाच वर्षासाठी आरक्षणनिहाय सरपंच पदाची संख्या निश्चित करून याची सोडत मंगळवारी करण्यात आली. यानुसार कोंडअसुर्डे, काटवली व पाटगावमध्ये सरपंचपद अनुसूचित जातीतील उमेदवारासाठी राखीव झाले आहे.

शहरातील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहामध्ये तहसीलदार अमृता साबळे व नायब तहसीलदार सुरेश गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यात उपस्थित विद्यार्थ्यांकडून चिठ्या काढून ही सोडत करण्यात आली.

सोडतीनुसार प्रत्येक प्रवर्गातील आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आली. यामध्ये कोंडअसुर्डे, काटवली व पाटगाव या ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती हे आरक्षण पडले आहे. अनुसूचित जाती स्त्री उजगाव, आंबेडखुर्द, शिवधामापूर या गावच्या सरपंच पदासाठी आरक्षण पडले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये नावडी, लोवले, देवळे, करजुवे, साखरपा, आंबवली, वाशी तर्फे संगमेश्वर, कोळंबे, घोडवली, कोंडकदमराव, तेऱ्हे, हरपुडे, बामणोली, तुळसणी, कुरचुंडा, चाफवली, वांझोळे हे आरक्षण जाहीर झाले आहे.

मेढे तर्फे फुणगुस, ओझरे, असुर्डे, शेंबवणे, कळंबुशी, किरडुवे, आंबव, चोरवणे, ताम्हाणे, मांजरे, पिरंदवणे, निवळी, शिवणे, साडवली, शृंगारपूर, बोरसूत व आंबेड बुद्रुक सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग त्री हे आरक्षण निश्चित करण्यात आले.

परचुरी, हिंगणी, वाशी तर्फे देवरुख, निवे बुद्रुक, कोसुंब, करवेळे तर्फे संगमेश्वर, वायंगणे, भडकंबा, पूर्वे तर्फे देवळे, किरवेट, बोंडये मारळ, खडीकोळवण, मोर्डे, कडवई, कुचांबे, गोळवली, अंत्रवली, कसबा संगमेश्वर, कुंभारखणी खुर्द, उमरे, गुरववाडी, पोचरी, कोंडगाव, सरंद, पेढांचे, कुळये, मुचरी, तळेकांटे, पूर्वे तर्फे सावर्डे, कर्ली, धामापूर तर्फे देवरुख, सायले, घाटीवळे, आंगवली, कासारकोळवण, राजवाडी, बुरंबाड, कुंभारखणी बुद्रुक, फणसवणे, मेघी, सांगवे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

तालुक्यातील मुरादपूर, नांदळज, पांगरी, पूर, फणसवळे, विघ्रवली, सोनावडे, तिवरे तर्फे देवळे, मुर्शी, दाभोळे कानकडी, निवे खुर्द, देवळे, बेलारी, रांगव, धामणी, कारभाटले, नायरी, तिवरे घेरा प्रचितगड, कोंडीवरे, आरवली, मुरडव, नारडुवे, धामापूर तर्फे संगमेश्वर, तांबेडी, तुरळ, ओझरखोल, वांद्री, मावळगे, कासे, राजीवली, ओझरे बुद्रुक, डावखोल, हातीव, कोंड्ये, मासरंग, पाचांबे,
कळंबस्ते, माभळे, फुणगूस, माखजन, शिरंबे, कुंडी व फणसट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण पडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 23/Apr/2025