राजापुरात ५१ ग्रामपंचायतीत महिलांसाठी आरक्षण जाहीर

राजापूर : राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जाहीर झाले. महिलांसाठी ५० टके आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३५. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी १४ आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती असे १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले.

दरम्यान तालुक्यातील अनेक मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने काहीना लॉटरी लागली तर अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहीच्या पदरी निराशा पडल्याचे पहावयास मिळाले.

मुंबई, गोवा महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, नायब तहसीलदार दीपाली पंडीत यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले.

सर्वप्रथम अनुसूचित जाती जमाती यांचे आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात या प्रवर्गाच्या एकूण ३ ग्रामपंचायती आहेत, कळसवली, केळवली आणि शिवनेबुद्रुक ५० टक्के आरक्षण धोरणानुसार कळसवली आणि केळवली या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती महिला सरपंच पदासाठी तर शिवणे बुद्रुक याच प्रवर्गासाठी आरक्षित झाली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये २७ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यात आजीवली, हसोळ तर्फे सौदळ, जैतापूर, कोतापूर, नाटे, हातीबले, आंगले, दसूर, चुनाकोळवण, तळगाव, आडवली, मंदरुळ, पांगरे बुद्रुक, सागवे, यांचा समावेश आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित झाले, त्यात ओशिवळे, धाऊलवल्ली, डोंगर कोंडवे तर्फे सौंदळ, मोरोशी, सोलगाव ताम्हाणे, उपळे, वाटुळ, वाल्ये वेळवण, झर्ये, साखरी नाटे य ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

७१ ग्रामपंचायती सर्वसाधारण गटात आहेत. त्यात ३५ ग्रामपंचायत महिलासाठी आरक्षित झाल्या त्यामध्ये कोंडेकाळे, तुळसवडे, ससाळे गोवळ, भालावली, कोदवली कुवेशी, देवीहसोळ, जुबाटी शिवनेखुर्द, पाचल, माडबन, गोठणे दोनीवडे, प्रिंदावन, साखर वडदहसोळ, हरळ, हावदे, खर्ड कोळवण, कोळंब, सौदळ पांगरीखुर्द कोडे तर्फे राजापूर, काजीर्डा, दळे तेरवण, कारवली, ओझर, रायपाटण
शीळ, करक, धोपेश्वर, राजवाडी, मोसम, शेढे यांचा समावेश होता तर सर्वसाधारण ३६ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये अणसुरे, करोळी, शेजवली, महाळुंगे, खरवते, खिणगिणी, आंबोळगड, ओणी, भू, चिखलगाव, देवायेगोठणे, दोनीवडे, जुवे जैतापूर, जवळेथर, कुंभवडे, कोडसर बुद्रुक, मिठगवाणे, मूर, मिळंद, नाणार, निवेली, पडवे, परुळे, पन्हाळे तर्फे सौदळ, परटवली, पेंडखले, तळवडे, तारळ, बडापेठ, क्लिये, येरडव, फुफेरे, उन्हाळे, वडवली, कणी, मोगरे यांचा समावेश आहे.

राजापूर तालुक्यातील जाहीर होणाऱ्या १०१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले होते. मनाजोगे आरक्षण पडावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र घोषित झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाने काशीना लॉटरी लागली तर काहीच्या पदरी घोर निराशा पडली. तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने आता तेथे महिला राज येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 23/Apr/2025