दापोली : दापोली नगर पंचायतीच्या नगरसेविका जया साळवी यांची दापोली तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड झाली आहे. ग्रामीण अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने दापोलीत पहिल्यांदाच महिलेच्या हाती तालुक्याची धुरा दिली असून राजकीय क्षेत्रात महिलांना पुढे जाण्याची ही एक संधी आहे, असे बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दापोली ग्रामीण साठी जया साळवी तर दापोली शहर साठी खेड येथील जिल्हा उपाध्यक्ष नागेश धाडवे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सरचिटणीस श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस भालचंद्र कोकणे, विवेक भावे, महिला मोर्चा अध्यक्षा मधुरा खोत, शहराध्यक्षा वैष्णवी वेल्हाळ, शहराध्यक्ष संदीप केळकर, जिल्हा चिटणीस मकरंद म्हादलेकर, विनोद लयाळ, धिरज पटेल, दिपक महाजन, स्वरूप महाजन अमोल चोरगे, अमोल तांबे, पांडुरंग पावसे, शैलेश कालेकर यांच्यासह बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 23/Apr/2025












