रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार २४ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वा. सुमारास नाचणे रोड येथील इब्राहीम सन्स दुकानासमोर घडली.
या प्रकरणी समीर सुरेश पाटील (रा. यशोधन अपार्टमेंट अभ्युदयनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एस-७४४७) घेऊन एसटी स्टँड ते अभ्युदय नगर असे येत होते. ते नाचणे येथील इब्राहिम सन्स दुकानासमोर आले असता कार्निवल हॉटेलच्या गल्लीतून अचानकपणे बाहेर आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारची फिर्यादीच्या दुचकीला धडक असून हा अपघात झाला. यात फिर्यादीच्या खांद्याला दुखापत झाली असून, कार चालकाने तिथून पळ काढला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:49 AM 30/Apr/2025














