Illegal Liquor Consumption : मांडवी परिसरात विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Illegal Liquor Consumption : मांडवी परिसरात विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

पेटकिल्ला मार्गावरील कारवाई; मद्यप्राशनासाठी परवाना नसल्याने कायदेशीर पाऊल

Illegal Liquor Consumption : रत्नागिरी शहरातील मांडवी बीच ते पेटकिल्ला मार्गावरील स्वरूप बारजवळ विनापरवाना मद्यप्राशन करताना आढळल्याने एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहान अलताफ सय्यद (वय २७, सध्या रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२५ च्या सुमारास घडली.

कच्च्या रस्त्यावर सुरू होता मद्यप्राशन प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, फरहान सय्यद हा मांडवी येथील कच्च्या रस्त्यावर रम पाण्याच्या अर्धा लिटरच्या बाटलीत मिसळून पित असताना पोलिसांना निदर्शनास आला. त्याच्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

Happy journey

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई

विनापरवाना मद्यसेवन केल्याप्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून कडक नजर ठेवली जात असून, यापुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.