देवरुख : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमी मार्फत संगमेश्वर तालुक्यातील ९ वर्षा वरील व १७ वर्षा आतील मुलामुलींकरीता अकादमीमार्फत दिनांक १ ते ६ मे दरम्यान तायक्वाँदो खेळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त मुला मुलीनी सहभागी व्हावे. व तायक्वाँदो खेळातून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व नोकरी साठी ५ टक्के आरक्षण. १०वी १२वी ग्रेस मार्क तसेच क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तायक्वांदो खेळातून मदत होते. हे प्रशिक्षण दळवी वृंदावन मराठा कॉलनी देवरूख नगरपंचायत तायक्वांदो हॉल देवरूख येथे होणार आहे.
सायंकाळी ४ ते ५.३० दिनांक १ ते ६ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीसाठी तायक्वाँदो अॅकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 01/May/2025














