रत्नागिरी : शाळकरी मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या संशयिताला जामीन

रत्नागिरी : तालुक्यातील शाळकरी मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. समीउल्ला अल्लाबखास जांभारकर (वय २६, रा. जयगड साखर मोहल्ला रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पुर्णगड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली होती.

गुन्ह्यातील माहितीनुसार पीडित मुली या १७ एप्रिल २०२५ रोजी नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी चालत जात असताना संशयित आरोपी हा त्या ठिकाणी आला. यावेळी आरोपी याने आपल्याशी गैरवर्तन केले, अशी तक्रार पीडितेने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दिली होती.

त्या नुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ७५ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनिमय २०१२ (पॉक्सो) चे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आरोपीला अटक करण्यात आली होती.

आरोपीच्या वतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, गुन्ह्याचे तपासकाम जवळपास पुर्ण झालेले आहे. संशयित आरोपी याने कोणताही अपराध केलेला नसुन तो निर्दोष आहे. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो कोठेही पळून जाणार नसून न्यायालयाकडून घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करेल. असे सांगण्यात आले तर सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.

जामीनावर मुक्तता केल्यास तो अधीक गंभीर गुन्हा करु शकतो. असे न्यायालयापुढे मांडण्यात आले. दरम्यान न्यायालयाकडून आरोपी समीउल्ला याला सशर्थ जामीन देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 01/May/2025