चिपळूण : लोटिस्मात श्रीब्रह्मेन्द्रस्वामींच्या तैलचित्राचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालन प्रकल्पांतर्गत, श्रीब्रह्मेन्द्रस्वामींच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश गोसावी यांच्याहस्ते अक्षय्यतृतीयेस करण्यात आले.

जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश गोसावी यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला परशुराम देवस्थानच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, संचालक धीरज वाटेकर, मधुसूदन केतकर, प्रकाश घायाळकर उपस्थित होते. श्रीब्रह्मेन्द्रस्वामी यांनी इ.स. १७१० साली मंदिराचा जीर्णोद्धार करून आजचे भव्य स्वरूप दिले.

त्यांनी आखून दिल्याप्रमाणे गेली तीनशे वर्षे भगवान परशुरामांचा जन्मोत्सव साजरा होतो. पेशवाईत ब्रहोंद्रस्वामी यांचे मोठे प्रस्थ होते. आदी माहिती यावेळी इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 02/May/2025

JMBR