खेड : रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

खेड : खेड तालुक्यातील भोस्ते बोगद्याजवळ, मैल दगड क्रमांक ०९९६ ते ०९९७ दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काल (दि. १ मे २०२५) दुपारी १२.१२ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या पुरुषाचे अंदाजे वय ४२ वर्षे आहे.

त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 02/May/2025

Mahrashi karve ANM