रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे नैसर्गिक जीवनपद्धतीविषयी रत्नागिरीत शनिवारी (दि. ३ मे) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिपळूण येथील निसर्गोपचारक सदाशिव बापट यांचा हा कार्यक्रम चर्चात्मक स्वरूपात होणार आहे.
अन्नाची उपयुक्तता कशी आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे निरनिराळे आजार आणि त्यावर साधे साधे उपाय काय आहेत, काही औषधी झाडांची पाने, फुले आणि त्यांचे निरनिराळ्या आजारात कसे फायदे होतात तसेच काही घरगुती उपचार यांची माहिती देणारा अतिशय उद्बोधपूर्ण आणि प्रत्येकाने आपली तब्येत उत्तम ठेवण्यासाठी ऐकावा असा हा माहितीपूर्ण चर्चात्मक कार्यक्रम आहे.
शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत रत्नागिरी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या यशवंत हरी गोखले भवनात हा कार्यक्रम होणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 02-05-2025














