चिपळुणात उद्या हिंदूत्ववादी संघटनांकडून निषेध मोर्चा

चिपळूण : देशात होणारे अतिरेकी हल्ले, बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी या पार्श्वभूमीवर चिपळुणातील सकल हिंदू संघटना व हिंदूत्ववादी संघटना यांच्या माध्यमातून रविवार दि. ४ रोजी सकाळी १० वा. निषेध महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात तीव्र संतापाची लाट आहे. दहशतवाद व अतिरेक्यांचा पूर्णतः बीमोड व्हावा, त्याचबरोबर बांगलादेशी, रोहिंग्यांची घुसखोरी थांबवावी, भारतात घुसखोरी केलेल्यांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवावे. तसेच काश्मीरमध्ये शासनाने कठोर कारवाई करून दहशतवाद पूर्णपणे मोडून काढावा, अशा मागणीसाठी रविवार दि. ४ रोजी सकाळी ११ वा. हिंदूत्ववादी संघटनांच्या माध्यमातून चिपळुणात निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चाची सुरुवात इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रापासून होणार आहे. शिवाजी चौक मार्गे बाजारपेठ व पुन्हा पोलिस ठाण्यावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे. तरी, हिंदूत्ववादी संघटनांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 03/May/2025