चिपळूण : पाचाड येथील पाझर तलावाचे अंदाजपत्रक लवकरच

चिपळूण : पाचाड येथील पाझर तलावाचे बांधकाम पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी महाराष्ट्रदिनी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर याची दखल घेत बांधलेल्या पाझर तलावाचे अंदाजपत्रक महिनाभरात तयार केले जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता प्रतिक झिंगे यांनी पाचाड ग्रामस्थांना दिले आहे. तसेच ७ मे रोजी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी या बंधाऱ्याची पाहणी करतील, असे आश्वासन दिले. यानंतर पाचाड ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले.

सन १९९४-९५ मध्ये बांधलेल्या व दुर्लक्षित राहिलेल्या पाझर तलावाच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी १ मे पासून उपोषण सुरू केले होते. १ मे रोजी सकाळी ग्रामस्थ उपोषणाला बसले. याची दखल घेत उपअभियंता झिंगे यांनी पाचाड येथे जाऊन उपोषणकर्त्या लोकांची भेट घेतली व आश्वासन दिले. या उपोषणाला पाचाडचे सरपंच नरेश घोले, उपसरपंच रमेश सुर्वे, गजानन सुर्वे, जलदूत शाहनवाज शाह, अनिता साळुंखे, दीपाली तेवरे, गायत्री सुर्वे, पार्वती सुर्वे, मंगल गुरव, नितीन नार्वेकर, अशोक तावडे, मंगेश साळुंखे, शिवाजी तेवरे, संदीप वाजे, रामचंद्र सकपाळ, गणेश चिले, रवींद्र सकपाळ आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 03/May/2025

Shanti real estate 1