लांजा : लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा तातडीने रद्द करावा आणि शासनाने नव्याने एजन्सी नेमून प्रत्यक्ष जागेवर जाऊन विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी लांजा कुवे नगरपंचायतीमधील नागरिकांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.
लांजा येथे आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांना नागरिकांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
लांजा नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, शासनाच्या मदतीसाठी टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नेमण्यात आली होती; परंतु नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण न करता विकास आराखडा तयार केल्याने त्यामध्ये असंख्य त्रुटी निर्माण झालेल्या आहेत.
त्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे नागरिकांना भविष्यात आर्थिक नुकसानीसह जागा, जमिनी, घरांचे मोठे नुकसान होणार आहे.
लांजा-कुवे शहरामध्ये अनेक वाडीवस्त्या या दाटीवाटीने असून, त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे अनेकांची घरे तुटली जाणार आहेत. रिंगरोडच्या नावाखाली नव्याने काढण्यात आलेला ११ मीटरचा रस्ता बाहेरून येणे गरजेचे होते; परंतु तसे न करता वाड्यावस्त्यांतून नेण्यात आला असल्याने यामध्ये घरांचे नुकसान होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 03/May/2025














