खेड : कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टी हंगामासाठी ८ एप्रिलपासून चालवण्यात येत असलेल्या २२ डब्यांच्या इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. वसई मार्गे धावणाऱ्या स्पेशलच्या १३ जूनपर्यंत फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
०६०९७/०६०९८ क्रमांकाची इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल दर मंगळवारी इरोड येथून सकाळी ६.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता बारमेर येथे पोहचते. परतीची दर शुक्रवारी धावणारी स्पेशल बारमेर येथून रात्री १०.५० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ८.१५ वाजता इरोड येथे पोहचते. स्पेशलला कोकण मार्गावर मडगाव, करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आदी स्थानकात थांबे आहेत. या स्पेशलमुळे नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
कोकण मार्गावर चार गाड्या धावल्या उशिराने उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीन धावत आहेत. गुरुवारी चार रेल्वेगाड्यांना लेटमार्क मिळाल्याने प्रवाशांच्या झालेल्या रखडपट्टीने प्रवासी त्रस्त झाले. नागपूर-मडगाव स्पेशल ३ तास विलंबाने रवाना झाली. उधना-मंगळूर स्पेशल १ तास ४० मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या गाड्यांच्या अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 03/May/2025














