देवरूख तलाठी कार्यालयात अभ्यागत कक्ष स्थापन

देवरूख : शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवस कृती आराखडा योजनेअंतर्गत राज्यभर विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र दिनी संगमेश्वर तालुक्यातील तलाठी कार्यालय देवरूख येथे सुसज्ज असा अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे उ‌द्घाटन तहसीलदार अमृता साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय कामकाजासाठी तलाठी कार्यालयात ग्रामस्थ येत असतात. यावेळी उपस्थित अभ्यागतांना टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या माहितीचे संकलन करून चलचित्रफीत दर्शवण्यात येणार आहे. वेळेचा सदुपयोग व्हावा व शासकीय उपक्रमांची माहिती नागरिकांना व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. याचबरोबर खुर्चा, पाण्याची व्यवस्था, माहिती फलक प्रसिद्ध केले आहेत. मंडळ अधिकारी रोहीत पाठक यांच्या संकल्पनेने सदर अभ्यागत कक्ष अद्ययावत करण्यात येत आहे.

रोहित वाकचौरे, ग्राम महसूल अधिकारी देवरुख यांनी ई-पीक पाहणी, agristack, ई-हा इत्यादी माहितीचे व्हिडीओ संकलित केले असून ते नियमितपणे प्रसारित केले जाणार आहेत. शासन उपक्रमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी या चलचित्रफितींचा निश्चित उपयोग होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 05/May/2025