खेड : आयनी जुवळा येथे रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील आयनी जुवळा येथील रेल्वे ट्रॅकवर ३ मे रोजी सकाळी मंगला एक्सप्रेसच्या धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सौरभ सुभाष तांबे (२४, रा. अंजणी बौद्धवाडी क्र. २, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा सकाळी १० च्या सुमारास घरातून पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडला होता.

त्यानंतर सुमारे १०.३२ वाजता आयनी जुवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ मंगळा एक्सप्रेसने धडक दिल्याचे संबंधित ट्रेनच्या ड्रायव्हरने सांगितले. या धडकेत सौरभ याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात संध्याकाळी ६.२३ वाजता करण्यात आली आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 05/May/2025