लांजा : लांजा तालुक्यातील साटवली मावळतवाडी येथील ४० वर्षीय विजय भोवड यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मद्यधुंद अवस्थेत पडलेले असताना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजय भोवड यांना दारू पिऊन पडण्याची सवय होती. ०३ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते साटवली बाजारपेठेत गेले होते.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ते ग्रामपंचायत साटवली येथे त्यांच्या भावाला पडलेले आढळले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने साटवली सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 05/May/2025














