चिपळूण : पाग बायपासजवळ होणार गतिरोधक

चिपळूण : चिपळूण शहरातील पाग भागात महामार्गावर बायपास जवळ १५ दिवसांत गतिरोधक जनतेला दिसेल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात महामार्ग कामाबाबत व अडचणींबाबत बैठक झाली. यावेळी भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पाग भागात महामार्गवर गतिरोधक का महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिक कसे प्रयत्न करीत आहेत आणि अपघातांचे प्रमाण किती वाढले याची माहिती दिली. ना. सामंत यांनी लगेच जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी करून सर्व माहिती दिली. तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालय यांनीही हा गतिरोधक किती महत्त्वाचा आहे, त्याचा अहवाल दिला आहे. त्या अहवालाचा व नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा आधार घेत लवकर काम होऊ दे, असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

यावेळी महामार्ग कामामुळे पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी, नळ पाईप, गटार स्वच्छता याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 05/May/2025