खेड : जगबुडी नदीच्या विसर्जन घाटाजवळ ०२ मे रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह जगबुडी नदीच्या पाण्यात खडकाळ भागात तरंगताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी तातडीने खेड पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 05/May/2025













