रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेमध्ये दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांकरीता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक व अधिकारी, कर्मचारीवर्ग तसेच को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

बँकेने यावर्षी कर्मचाऱ्यासाठी विविध स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, रस्सीखेच, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, फनी गेम्स सारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. क्रिकेट स्पर्धेमत संगमेश्वर तालुका संघ विजेता तर प्रधान कार्यालय रत्नागिरी संघ उपविजेता ठरला. रस्सीखेचमध्ये लांजा तलुक्याला मागे टाकत संगमेश्वर तालुक्याने बाजी मारली. संगीत खुर्चीत महिलांमध्ये मनिषा केळकर तर पुरुषांत संदीप तांबेकर यांनी विजेतेपद पटकावले. रांगोळी स्पर्धेत अनुजा पुनसकर विजेत्या तर सतिष सावंत उपविजेते ठरले. कॅरम स्पर्धेत महिला जेतेपद अनुजा पुनसकर विजेत्या श्रेया खडपे उपविजेत्या ठरल्या. पुरुषांमध्ये फरिद जुवळे विजेते तर सतिष सावंत उपविजेते ठरले. बुद्धीबळ स्पर्धेत सुनिल वैद्य विजयी तर प्रदीप परीट हे उपविजेते ठरले.

बँकेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्क्रमात महाराष्ट्र गीत, फिल्मी गीत, रेकॉर्ड डान्स यांचे उत्तम सादरीकरण तर संगमेश्वर तालुक्याने तसेच त्यांचे सोबत अन्य तालुक्यांतील काही कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पारंपारिक नमनाने उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३- २४ करीता सभासदांना ३०% लाभांश देवून ऐतिहासीक विक्रम केला तसेच बँकेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करून ९५ कोटी इतका ऐतिहासिक नफा मिळवला. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच बँकेची प्रगती होत असते याची दखल घेऊन, याचेच पारितोषिक म्हणून बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव सर्व संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी यावर्षीचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या स्वरूपात करण्यासाठी मान्यता दिली. यामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच पुढाकारामुळे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिमखात आणि उत्साहात झाला.

या कार्यक्रमावेळी बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, डॉ. अनिल जोशी, महेश खामकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर, श्रीकृष्ण खेडेकर तसेच को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत व युनियनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे समारोपावेळी सुनिल साळवी व नरेंद्र सावंत यांनी बँकेच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले व अशा पद्धतीचा कार्यक्रम कोणत्याही इतर सहकारी बँकेत केला जात नसल्याचे सांगितले व बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. शेवटी बँकेचे उपसरव्यवस्थापक संदीप तांबेकर यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन जितेंद्र साळवी व त्रिवेणी माळवदे यांनी केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मान्यता दिली त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 05/May/2025