खेड : मांडवे येथे प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड : खेड तालुक्यातील मांडवे गावठाणवाडी येथे राहणाऱ्या दिलीप दत्ताराम घाग (५७) या व्यक्तीचा उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी ०४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०४ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिलीप घाग यांना त्यांच्या मांडवे येथील घरी अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांच्या मुलाने आणि आई सुलोचना घाग यांनी त्यांना तातडीने खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिलीप घाग यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 05/May/2025