गणपतीपुळे : रत्नागिरी कारवांचीवाडी फाटा समोरील खेडशी नवीन वसाहत नगरातील सर्व पदाधिकारी व कारवांचीवाडी नगरातील सर्व पदाधिकारी यांच्या शिष्ठ मंडळाने रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष कारवांचीवाडी फाटा ते महालक्ष्मी स्टील च्या मध्ये पदचारी उड्डाणपूल बांधून देण्यासाठी नकाशासह निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी उड्डाणपूल करून देण्याचे मान्य केले.
तसेच त्यांनी खेडशी नवीन वसाहत व कारवांची वाडी नगरातील सर्व पदाधिकाऱ्यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या दालनात नॅशनल हायवे चे पदाधिकारी यांच्या समवेत निर्णय घेऊन पादचारी उड्डाणपूल बांधून देण्याचे आदेश दिले. नॅशनल हायवे कोल्हापूरचे सर्व अधिकारी यांनी कारवांचीवाडी फाटा येथे ३० एप्रिल रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच उड्डाणपूल बांधून देण्याचे मान्य केले. या उड्डाणपुलामुळे खेडशी नवीन वसाहत व कारवांची वाडीमधील सर्व नागरिकांना हायवे ओलांडण्यासाठी सुरक्षित होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 06/May/2025














