दापोली तालुक्याचा १२ वीचा निकाल ९३.३५ टक्के

दापोली : दापोली तालुक्याचा १२ वीचा निकाल ९३.३५% इतका लागला आहे. या परीक्षेत तालुक्यात मुलींनी बाजी मारली आहे. तालुक्यातून १ हजार ४१५ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. यात १ हजार ३२१ विद्यार्थी पास झाले असून एकूण ९३.३५ टक्के निकाल लागला आहे.

दापोली ज्ञानदीप विद्यामंदिरच्या संतोषभाई मेहता वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची हर्षदा मोडक ही ९५.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल ठरली आहे. या मध्ये एन. के वराडकर कॉलेज ८२.०७ टक्के ए. जी कॉलेज ९६.७८, डी पी दांडेकर केळशी ९२.६८, घोले कॉलेज वाकवली ८१.६६, बुटाला कॉलेज गावतळे १००, वेळवी ८३.३३, नॅशनल कॉलेज दापोली ९६.७८, राम राजे कॉलेज ९४.७७, मेहता कॉलेज १००, हर्णे कॉलेज १०० सानेगुरुजी पालगड ९६.८७, लोकमान्य टिळक चिखलगाव ९७.०५ असा शाळा निहाय निकाल लागला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 06/May/2025