देवरुखमध्ये ७ मे पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

देवरुख : भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुकाच्या पुढाकाराने कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण गौरव चषक भव्य निमंत्रितांसाठी राज्यस्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सव ७ ते ९ या कालावधीत देवरूख येथे होणार आहेत. भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका पुरस्कृत व दत्त नगर स्पोर्ट्स क्लब, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने या राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळयाला महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे. बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे. चिपळूण संगमेश्वर चे आम. शेखर निकम. माजी आमदार प्रमोद जठार. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचेसह राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण गौरव चषक भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम ७मे सायं ६.३० ते रात्री ११ स्पर्धेचे उद्घाटन साखळी फेरीतील सामने, ८ मे रोजी सायं ६ ते रात्री ११ साखळी फेरी व उपउपांत्य फेरीचे सामने, ९ मे रोजी सायं ६ ते रात्री ११ रात्री उपउपांत्य, उपांत्य व अंतिम सामना पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, कॉलेज मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेची तयारी तालुका भाजपा अध्यक्ष रुपेश कदम, विनोद मस्के, अभीजीत शेट्ये, नीलेश भुरवणे, सुशांत मुळये, जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी अभीजीत सप्रे सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 06/May/2025