रत्नागिरी : एसटीत सुट्या पैशांवरून वृद्धाला मारहाण

रत्नागिरी : एसटीच्या वाहकाने सुट्या पैशावरुन वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. दुखापतग्रस्त वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरेश गोपाळ गुरव (६७, रा. खेडशी, रत्नागिरी) असे दुखापतग्रस्त वृद्ध प्रवाशाचे नाव आहे. ही घटना मंगळवार ६ मे रोजी दुपारी १ व. सुमारास नाखरे ते पावस एसटी बसमध्ये घडली.या घटनेमधील वृद्ध सुरेश गुरव हे नाखरे ते पावस गाडीने रत्नागिरीकडे येत असताना त्यांच्याकडे तिकिटाचे सुटे पैसे नव्हते या बाबत एसटी वाहक याच्यात बाचाबाची झाली. वाहकाने वृद्ध प्रवाशाला ढकला बुकल केली. वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केली असून, रहाटाघर बस स्थानकात अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 08/May/2025