राजापूर : केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच ठिकाणी मॉक ड्रिल होणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे राजापूर शहरात जवाहर चौकात बुधवारी सायंकाळी ४ वा. प्रशासनाच्या वतीने अत्यंत यशस्वी पध्दतीने ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम करण्यात आले.
सहायक जिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ. जैसमीन, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल पार पडले.
या मॉक ड्रिल अंतर्गत जवाहर चौक राजापूर येथे शत्रुचा हवाई हल्ला होऊन शहरातील बसस्थानक व नगर परिषद कार्यालयीन इमारतीवर हवाई बॉम्ब हल्ला झाला. त्यावेळी शत्रूचा हल्ला झाल्याची सूचना प्राप्त होताच भोंगा (सायरन वाजवून शहरातील नागरिकांना शत्रूचा हल्ला झाल्याची सूचना करण्यात आली व सतर्क राहणेबाबत कळविणेत आले. दूरध्वनी वरुन शासकीय वरिष्ठ पातळीवर शहरात हल्ला झाल्याचे कळविणेत आले. पोलिस विभाग, ग्रामीण रुग्णालय, होम गार्ड यांना याबाबत सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या.
राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांना या मॉक ड्रिलसाठीचा हा आरखडा तयार केला होता. या मॉक ड्रिल मध्ये राजापूर न. प. विभाग, तहसीलदार, पंचायत समिती, ग्रामीण रुगणालय यांसह अन्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच राजापुरातील नागरिक, स्वयंसेवी संघटना तसेच भाजपा, शिवसेना, शिवसेना (उबाठा), बजरंग दल कार्यकर्त्यांनीही सहभागी होव मोलाचे सहकार्य केल्याचे प्रशासनाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 08/May/2025














